शहरातील १९ वार्डामधून १३६ गोण्या प्लास्टिक कचरा संकलित

बातमी शेअर करा...

शहरातील १९ वार्डामधून १३६ गोण्या प्लास्टिक कचरा संकलित

मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचे आदेश

जळगाव : मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्लॉस्टीक कचरा संकलीत करून विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले असल्याने आज दि ९ मे रोजी प्रभाग समीती क्र १ ते ४ अंर्तगत येणारे वार्ड क्र१ ते १९ मध्ये विशेष मोहीम राबवुन सर्व मुख्य रोड लगत चे प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला. यात एकुण १३६ गोण्या प्लास्टीक कचरा गोळा करून जमा केलेले प्लास्टीकचे शासकिय नियमा नुसार विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आले. हि मोहीम सहा. आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे सर्व आरोग्य निरीक्षक व वार्ड मुकादम यांनी सफाई कामगारांकडून राबवली. आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी सदर मोहीम राबविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम