शहिद जवान स्वप्निल सोनवणे यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा...

शहिद जवान स्वप्निल सोनवणे यांच्यावर सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार

 

“वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी गुढे गाव दुमदुमले

 

भडगाव: कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने शहिद झालेले सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवान स्वप्निल सुभाष सोनवणे यांच्यावर आज (मंगळवारी) त्यांच्या मूळ गावी गुढे येथे पूर्ण सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गावातील नागरिक, नातेवाईक, माजी सैनिक आणि मान्यवरांनी आपल्या या वीरपुत्राला अश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करत असताना जवान सोनवणे यांना विजेचा धक्का बसला होता. त्यांना तातडीने बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

उपस्थित मान्यवर

आज सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, ५७ बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर आणि सलामी पथक उपस्थित होते.

याशिवाय, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुमित दादा पाटील, माजी सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माजी सैनिक फेडरेशन भडगावचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पनाताई महाजन आणि पोलीस पाटील मिलिंद मोरे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम