
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रणव वाकोडे याचा माजी आमदार सानंदा यांनी केला सत्कार !
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रणव वाकोडे याचा माजी आमदार सानंदा यांनी केला सत्कार !
खामगाव प्रतिनिधी I श्री संत नारायण महाराज कनिष्ठ महाविद्यालय आंबेटाकळी या विद्यालयाचा 12 वी विज्ञान शाखेचा विद्याथ प्रणव सुरेंद्र वाकोडे या विद्यार्थ्याने नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी शुक्रवार दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालय येथे प्रणव वाकोडे याचा शाल व पुष्पगुच्छ घालून सत्कार केला व पेढा भरवून त्याचे तोंड गोड करीत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विदर्भ हौशी कबड्डी असो.चे सचिव अशोकबाप्पु देशमुख, शिवाजीराव पांढरे, गणेश पाटील, सुनील पाटील, केशव खंडारे, उत्तमराव राऊत, अवधूत टिकार, फिरोज खान, शिक्षक के.ई.केंद्र आदी उपस्थित होते.प्रणव वाकोडे या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम, जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम आणि जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. त्याची यवतमाळ येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षक शिक्षक के. ई. केंद्रे यांना दिले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम