
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत : आ. अमोल जावळे
शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत : आ. अमोल जावळे
यावल: विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शाश्वत विकासाची मूल्ये
अंगी बाणवावी, त्यातून आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांचा वेध घेणे आणि काहीतरी नवनिर्मिती करणे हाच विज्ञान प्रदर्शनाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन यावल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले.
सध्या महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा व यावल तालुक्यामध्ये नागरपालिका नगरपरिषदा यांचे निवडणुकीचे वारे वाहत असून सगळीकडे प्रचार सभा मोठ्या उत्साहात सुरू आहे त्यामध्ये यावल रावेर फैजपूर याही नगर परिषदेचे निवडणूक असल्याने आमदार अमोल जावळे यांचा निवडणुकीतील व्यस्तता बघता सर्व कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून त्यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांची आपुलकीने हितगुज केला व त्यांनी केलेल्या सादरीकरणाची विचारपूस देखील केली
यावल तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील सहभागी विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षकांशी प्रभात विद्यालय येथे याप्रसंगी आमदार जावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांविषयी आस्थेवाईकपणे माहिती करून घेतली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचनासुद्धा केल्या.
ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय हिंगोणे या संस्थेचे चेअरमन श्री. रविंद्र हरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश मनोहर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. जयंत चौधरी, जळगाव पतपेढीचे संचालक श्री. अजय पाटील, श्री. भरतभाऊ पाटील तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण ठाकूर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री नरेंद्र महाले यावल तालुका विज्ञान समन्वयक, मुख्याध्यापक श्री. मनोहर गाजरे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम