
शाळेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या काही तासात मुसक्या आवळल्या
पिंप्राळा परिसरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमधील घटना
शाळेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या काही तासात मुसक्या आवळल्या
पिंप्राळा परिसरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमधील घटना
जळगाव प्रतिनिधी
क्लासरुमचे कुलूप तोडून अनधिकृतपणे प्रवेश करुन शाळेतील दोन सिलींग फॅनसह अॅम्प्लीफायर चोरुन नेले. ही घटना दि. १ मार्च ते दि. ३ मार्च रोजी दरम्यान पिंप्राळा परिसरातील अँग्लो उर्दू हायस्कुलमध्ये घडली होती. तपासधिकाऱ्यांनी तपासचक्रे फिरवित संशयित सलमान खान फिरोज खान उर्फ पार्ले (रा. ख्वॉजा नगरी, पिंप्राळा हुडको) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील सावरकर नगरात शेख हकीम अब्दुल हमीद (वय ५८) हे शिक्षक वास्तव्यास आहे. दि. १ मार्च ते दि. ३ मार्च रोजी दरम्यान शाळा बंद असतांना चोरट्यांनी अँग्लो उर्दू हायस्कुलच्या क्लासरुमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शाळेतून २ सिलींग फॅन व अॅम्प्लीफायर असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ३ रोजी उघडकीस आल्यानंतर शेख हकीम यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम