शासकीय व निम शासकीय कार्यालयात चक्रधर स्वामी जयंती 5 सप्टेंबर ला साजरी करावी – जनसेवक पी जी पाटील
शासनाच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी
शासकीय व निम शासकीय कार्यालयात चक्रधर स्वामी जयंती 5 सप्टेंबर ला साजरी करावी – जनसेवक पी जी पाटील
शासनाच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी
पारोळा l प्रतिनिधी
शासकीय व निम शासकीय कार्यालयात चक्रधर स्वामी जयंती 5 सप्टेंबर ला साजरी करावी असे परिपत्रक 18 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केले आहे.
याची तालुक्यातील सर्व कार्यालयात अंमलबजावणी करावी या करिता महानुभाव परिषद व उपदेशक नामधारक वासनिक मंडळी यांच्या वतीने तहसीलदार देवरे साहेब
पंचायत समिती गट विकास अधिकारी किशोरजी शिंदे साहेब नगरपरिषद चे मुख्याधिकारी किशोरजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे जीव उद्धारक विचार तत्त्वज्ञान मानवतावादी शिकवण सर्व जीव जातीच्या कल्याणासाठी स्वामींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 5 सप्टेंबरला
सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन अर्थात जयंती साजरी करावी तसेच शाळा महाविद्यालय व कार्यालय आदी ठिकाणी साजरी करावी
अशी मागणी पारोळा तालुका महानुभाव परिषद व उपदेशी नामधारक वासनिक मंडळी यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी प पू प म चक्रपाणी बाबा म्हसवे, यशपाल दादा मुंदाने, तुषार मुनी दादा म्हसवे, जनसेवक पी जी पाटील पारोळा, अरुणराव देशमुख, दत्तात्रय पाटील,
ए ए पाटील, ए डी पाटील, बारकू गुरुजी, संजय पाटील, किशोर पाटील, भूषण पाटील, विनोद पाटील,
कौतिक पाटील, नितीन देसले, अरुण पाटील, जितेंद्र पाटील, कन्हैयालाल पाटील, साहेबराव पाटील इत्यादी उपस्थित होते.
हे हि वाचा👇
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम