शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील सुविधांसाठी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

बातमी शेअर करा...
शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील सुविधांसाठी
 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जळगाव, : जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निवास, आरोग्य, शिक्षण आणि मुलभूत सुविधा पुरेशा व दर्जेदार मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आश्रमशाळांतील वसतीगृहांची स्वच्छता, शिस्त व देखभाल, विद्यार्थ्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक साधनांची उपलब्धता, पोषणयुक्त भोजन व्यवस्था, स्वयंपाकगृहांची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह व अन्य मूलभूत सुविधा या विषयांवर भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांची उपस्थिती, सहभाग आणि शैक्षणिक प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, तसेच काही आश्रमशाळांमध्ये दिसून आलेल्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी कारवाई आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि शिक्षणक्षम वातावरण मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम