
शिक्षकांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व अधोरेखित
शिक्षकांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व अधोरेखित
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघनगर येथे १२ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचा विषय होता ‘शिक्षकांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व’. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शैलजा पप्पू दीदी आणि सौ. प्रांजली रस्से दीदी उपस्थित होत्या.
सौ. शैलजा पप्पू दीदी यांनी वाचनामुळे शिक्षक अधिक प्रतिभावान, गतिमान आणि सकारात्मक कसे राहतात, तसेच संस्कृतीची ओळख कशी होते, यावर मार्गदर्शन केले. दैनंदिन समस्यांचे निराकरण, विचारांमध्ये सखोलता आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी वाचनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकाचा पेहराव साधा असावा, मात्र त्याचे ज्ञान आणि विचार हेच त्याचे खरे अलंकार असतात, असेही त्यांनी नमूद केले. पु. ल. देशपांडे आणि गिरीश कुबेर यांसारख्या लेखकांचे वाचन करण्याची शिफारसही त्यांनी केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम