
शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत नाशिक बोर्डामधे महत्वाची बैठक संपन्न
रावेर प्रतिनिधी
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी सोमवार दि. २८ रोजी सकाळी एस.एस.सी. बोर्ड विभागीय कार्यालय,आडगाव शिवार, मुंबई -आग्रा महामार्ग, नाशिक येथे एस.एस.सी. बोर्डाचे अध्यक्ष व सचिव यांचे बरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर यांचे विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात मिटिंग आयोजित केलेली होती. नाशिक बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे,नाशिक बोर्डाचे सचिव मोहन देसले, नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, माध्यमिक वेतन पथक अधीक्षक शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील, संजय चव्हाण. एस.बी. देशमुख, मोहन चकोर, संजय पवार, जळगाव जिल्हा जुनिअर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे, रावेर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष एस.टी. महाजन, नूतन माध्यमिक विद्यालय चिनावलचे अध्यक्ष सुनील महाजन, शिक्षकेतर कर्मचारी संघटना रावेर चे गिरीश नारखेडे, श्री.ग.गो. बेंडाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.एच. वायकोळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी प्रलंबित शालार्थ आयडी तात्काळ देण्यात यावेत, प्रलंबित वैद्यकीय बिले तसेच नाशिक बोर्डाच्या संदर्भातील विविध प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये केंद्र संचालकांच्या अदलाबदलीचा विषय पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येऊ नये. अशी सर्व संघटना तर्फे मागणी करण्यात आली. यावर सकारात्मक चर्चा झाली .
कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भात वाढीव टप्पा अनुदान मंजूर करून ४०, ६०, व ८० टक्के अशा टप्प्याने वेतन अदा केले जावे. सन २०१-१२ नंतर २०२५ पर्यंत पायाभूत पदांवर काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात यावे. २० व ४० टक्के विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या थकित लेखनासाठी वाढीव तरतूद करून मागील चार महिन्याचे वेतन अदा केले जावे. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी शासन दोन हजार रुपये फी आकारात आहे. त्यामध्ये सवलत देण्यात यावी, एस.एस.सी. परीक्षा दरम्यान परीक्षा केंद्रांच्या संदर्भात कॉपी केसेस जाचक अटी रद्द करावी व परीक्षेचे कामकाज सुधारण्याची संधी द्यावी. आय.टी. विषयाला तात्काळ अनुदान मंजूर करावे. नाशिक बोर्डाचे साहित्य रावेर तालुक्यातील शाळांना मुक्ताईनगर ऐवजी पूर्ववत भुसावळच ठेवण्यात यावे. नासिक हायवे लगत बोर्डाच्या नावाचा फलक दोन्ही बाजूला मोठ्या ठळक स्वरूपात लावण्यात यावा. गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा फी माफ करण्यात यावी. या संदर्भात संघटना तर्फे पत्र देण्यात आले. जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांना ज्युनिअर कॉलेज मागण्यासंदर्भात समस्या सोडवण्यासाठी विनंती केली. यावेळी नाशिक विभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर संघटना पदाधिकारी, प्रतिनिधी सदर बैठकीसाठी उपस्थित होते .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम