शिक्षणशास्त्र विभागातर्फे ‘माणुसकीच्या जाणीवा’ उपक्रम उत्साहात

बातमी शेअर करा...

शिक्षणशास्त्र विभागातर्फे ‘माणुसकीच्या जाणीवा’ उपक्रम उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेतील शिक्षणशास्त्र विभागातर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘माणुसकीच्या जाणीवा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. हा उपक्रम सन २०२२ पासून सातत्याने राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना दृढ करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असून यावर्षी या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. यावर्षी हा उपक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आला.

सकाळी १० वाजता अन्नपूर्णेची पूजा करून आणि मनाचे श्लोक सामुहिक रित्या ग्रहण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी शिक्षणशास्त्र विभागाचे विद्यार्थी गणवेशात व ओळखपत्रांसह उपक्रम स्थळी उपस्थित होते. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील गरजू रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना आणि इतर हितगुज व्यक्तींना अन्नपाकिटांचे वितरण केले. एका वेळच्या जेवणाची चिंता दूर झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. वितरणावेळी गोंधळ होणार नाही याची काळजी घेत विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पार पाडले. या अन्नदान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सहानुभूती, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि संघभावना विकसित होण्यास मदत झाल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले. एखाद्या गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेले हास्य हेच आमच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाचे सर्वात मोठे यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सदर उपक्रमाची संकल्पना डॉ. मनीषा इंदाणी यांची होती. तर नियोजन व मार्गदर्शन डॉ. संतोष खिराडे यांनी केले. उपक्रम स्थळी मार्गदर्शक म्हणून डॉ. रणजित पारधे आणि डॉ. स्वाती तायडे हे उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष नियोजन आणि शिस्तपालन हे काम श्री संदीप वाघ आणि श्री योगेश कोरडेवाड यांनी बघितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षकेत्तर कर्मचारी जयेश पाटील, विवेक भावसार तसेच विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. ‘चला, एक पाऊल माणुसकीकडे’ या घोषवाक्याने सजलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान अधिक दृढ झाले असून पुढील काळातही हा उपक्रम सातत्याने राबविण्याचा विभागाचा मानस आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम