शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे – डॉ. अब्दुल करीम सालार

बातमी शेअर करा...

शिक्षण फक्त पदव्या नव्हे तर जाणीवेची ओळख आहे – डॉ. अब्दुल करीम सालार

बुरहानपूर प्रतिनिधी: मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी, बुरहानपूर व ऑल इंडिया उर्दू संपर्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, २४ ऑगस्ट रोजी एका भव्य पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रांताध्यक्ष सय्यद आरिफ अज़ीज यांनी भूषविले.

या सोहळ्यात बुरहानपूरातील एकूण १०५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला इमरान खान (मुंबई), नियाज अहमद (सतना), मुश्ताक मलिक (सनावद), लुकमान मसूद (खंडवा), मुइत खान, सफियान काझी (खंडवा), विनोद गोर (सनावद), हाजी वाजिद इकबाल, अजय रघुवंशी, मुशर्रफ खान, हामिदुल्ला डायमंड, फहीम हाशमी, मुश्ताक भाई जलेबीवाले, सलीम मास्टर, फजलुर्रहमान व इजाज अशरफी यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

समारंभाचे प्रमुख आकर्षण होते खानदेशातील आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. अब्दुलकरीम सालार (अध्यक्ष – इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगाव). त्यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात सध्याच्या शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकत मुस्लिम समाजाच्या अधोगतीवर भाष्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी म्हटले – “शिक्षण फक्त पदव्या नव्हे, तर जाणीवेची ओळख आहे. समाज आज शिक्षण घेतलेल्या पण कृतीशून्य लोकांनी भरला आहे. खरी पदवी तीच जी कृतीतून दिसते.”

तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन केले व सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसूद रियाज, अता उल्ला खान, सुहैल अहमद, अझहर हुसेन, हिकमत मुकादम, अकबर पठाण, इकबाल कौसिन, अफसर अली, तन्वीर अली आदींनी मोलाचे योगदान दिले.
समारंभाचे आयोजन मुस्लिम एज्युकेशनल सोसायटी बुरहानपूर जिल्हाध्यक्ष सय्यद जौझर अली यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. माजी आमदार अब्दुल हमीद काझी व फरीद सेठ यांचे मार्गदर्शन व आश्रय कार्यक्रमाला लाभले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम