
शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करावी- तहसीलदार शीतल राजपूत
तालुक्यातील गावांमध्ये ई-केवायसीसाठी शिबिरे
शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करावी- तहसीलदार शीतल राजपूत
तालुक्यातील गावांमध्ये ई-केवायसीसाठी शिबिरे
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ कायम राहावा, यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडिंग करून घेणे आवश्यक आहे. यासाठी जळगाव तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील गावांमध्ये ई-केवायसीसाठी शिबिरे घेण्यात येत आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी शिबिरात येऊन ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार शीतल राजपूत यांनी केले.
शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली आहे. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत. परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही. जळगाव तालुक्यात सुमारे ४८ हजार शिधापत्रिका धारकांमध्ये २ लाख १३ हजार ३१६ ई-केवायसीधारक आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ६३४ नागरिकांची केवायसी झाली असून ३० हजार ६४२ ग्राहकांची ई-केवायसी प्रलंबित आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर जनजागृती करून शिबिरे घेण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी:-संजय गायकवाड ,स्वस्त धान्य दुकानदार, जळगाव पुरवठा निरीक्षण अधिकारी रंजना बहादे, पुरवठा निरिक्षक दिपाली राजुपत ,ऑल महाराष्ट्र फेडरेशन संलग्न जळगांव शहर व ग्रामीण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष:- नितीन सपके यांनी ई-केवायसी मोहीम हात घेतली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम