
शिमला येथे दरड कोसळून जळगावच्या तरुणीचा मृत्यू
शिमला येथे दरड कोसळून जळगावच्या तरुणीचा मृत्यू
जळगाव: हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बुधवारी (आज) बसवर दरड कोसळून झालेल्या अपघातात जळगावची तरुणी लक्ष्मी रामचंद्र विराणी (वय २५, रा. मोहाडी रोड, जळगाव शहर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मी विराणी ही पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला होती. ती आपल्या काही मैत्रिणींसोबत शिमला येथे फिरायला गेली होती. बुधवारी, तेथून बसमधून प्रवास करत असताना मुसळधार पावसामुळे डोंगरावरून बसवर अचानक दरड कोसळली.
या अपघातात लक्ष्मीसह तिच्या शेजारी बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम