
शिरपूरच्या माजी उपनगराध्यक्षा छाया ईशी यांना मातृशोक
शिरपूर च्या माजी उपनगराध्यक्षा छाया ईशी यांना मातृशोक
कुसुबा (प्रतिनिधी) येथील कै शांताराम उखडू चौधरी यांच्या धर्मपत्नी व शिरपूर नगर परिषदेच्या मा उपनगराध्यक्षा सौ छाया शामकांत ईशी यांच्या मातोश्री श्रीमती सिंधुबाई शांताराम चौधरी यांचे (वय ७७)यांचे दि २१ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले.
त्या खान्देश तेली समाज मंडळ पुणे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ चौधरी, दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी यांच्या वहिनी तर अनिल चौधरी, प्रदिप चौधरी ,शिरपूर च्या माजी उपनगराध्यक्षा सौ छाया ईशी यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात २ मुले,३ मुली, दिर,जावाई, सुना,नातवंडे असा परिवार आहे.प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या सासू होत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम