शिरपूर येथे नवीन आधार किटचा आ अमरिषभाईंच्या हस्ते शुभारंभ

बातमी शेअर करा...

शिरपूर येथे नवीन आधार किटचा आ अमरिषभाईंच्या हस्ते शुभारंभ
शिरपूर (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय धुळे संचलित महा ई सेवा अंतर्गत जिल्ह्यात शासकीय आधार केंद्र कार्यरत आहेत त्यात काही केंद्रांना शासनातर्फे नविन किट देण्यात आले त्यात शामकांत ईशी यांच्या किटचा शुभारंभ माजी मंत्री आमदार श्री अमरिषभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले-.

राज्यात आधार केंद्र सुरू झालेपासून तेच किट आजपावेतो सुरू आहेत त्यामुळे ते व्यवस्थित चालत नव्हते व बंद पडत होते , त्यामुळे केंद्र चालकाना खूप मनस्ताप होऊन ग्राहकांच्या रोषाला बळी पडत होते.त्याची राज्य सरकारने दखल घेऊन काही प्रमाणात नवीन किट उपलब्ध करून दिले त्यात आधार केंद्र संचालक शामकांत ईशी यांनाही किट मिळाली.

त्या नविन किटचा शुभारंभ माजी मंत्री आमदार श्री अमरिषभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्वतः आ अमरिषभाई यांनी स्वतःचे आधारकार्ड अपडेट करून घेतले व शुभारंभ केला. यावेळी त्यानी शासनाने चांगल्या प्रकारचे किट उपलब्ध करून दिल्याने जनतेची सोय करून दिल्याने अभिनंदन केले.

केंद्र संचालक शामकांत ईशी यांनी सांगितले की शासनाकडे अनेक वर्षांपासून नवीन आधार किटची मागणी होती ती आता उपलब्ध करून दिल्याने शासनाचे आभार व्यक्त केले
यावेळी आमदार श्री काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि प माजीअध्यक्ष डॉ तुषार रंधे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,वासुदेव देवरे,अशोक कलाल,नवल वंजारी,,दीपक गुजर,नरेश चौधरी,नरेंद पाटील ,देवेंद्र राजपूत,विनायक कोळी, जितेंद्र सोनवणे,भरत चौधरी, सुनिल चौधरी, दिनेश चौधरी, मयुर ऐशी, प्रतिक ईशी ,सुनिल जैन,शिरीष चौधरी,योगेश्वर माळी व पदाधिकारी उपस्थित होते. आधार ऑपरेटर निलेश पावरा यांनी भाईसाहेबांचे आधार अपडेट करून घेतले .
यावेळी सर्व उपस्थित व शासनाचे आभार मानलेत.

धुळेजिल्हा सेतू समन्वयक विजय पाटील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दिपक पवार, जिल्हा प्रकल्प समन्वयक आयटी राहुल वाघ,कुणाल पाटील, जावेद शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम