
शिरसोलीतील चोरट्याला जैन व्हॅलीतुन पीव्हीसोलर केबल चोरल्याप्रकरणी अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
शिरसोलीतील चोरट्याला जैन व्हॅलीतुन पीव्हीसोलर केबल चोरल्याप्रकरणी अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव, प्रतिनिधी
जळगावच्या जैन व्हॅली एनर्जी पार्क, शिरसोली येथे पी. व्ही. सोलर केबल चोरीचा प्रकार उघड झाला होता. अज्ञात चोरट्याने वेळोवेळी २५० मीटर सोलर केबल वायर लंपास केली होती. यासंदर्भात कंपनीचे अधिकारी अविनाश बढे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती, ज्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की शिरसोली परिसरातील फैजल रज्जाक पिंजारी (वय २५, रा. शिरसोली, जळगाव) याने काही साथीदारांसह ही चोरी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवरा धरण, शिरसोली येथे सलग २-३ दिवस गुप्त तपास केला आणि सापळा रचून फैजल पिंजारीला ताब्यात घेतले.
आरोपीला कसून चौकशी केली असता त्याने चोरी करण्याची कबुली दिली आणि त्याच्या साथीदारांची माहिती उघड केली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून त्याचे इतर साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. संदीप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, राहुल कोळी यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. समाधान टहाकळे (एमआयडीसी पोलीस स्टेशन) करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम