शिरसोली येथील विवाहितेचा सासरकडून छळ; रिक्षासाठी पन्नास हजारांची मागणी

बातमी शेअर करा...

शिरसोली येथील विवाहितेचा सासरकडून छळ; रिक्षासाठी पन्नास हजारांची मागणी

जळगाव प्रतिनिधी: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या एका विवाहितेचा रिक्षा घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करत सासरकडील मंडळींकडून शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाळधी येथील पतीसह तिघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शितल भिकन कोळी (वय २७, रा. शिरसोली) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील भिकन विजय कोळी यांच्याशी काही वर्षांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर काही काळ सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच पती भिकन कोळी याने रिक्षा घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्यावर पतीसह सासू सुनंदा विजय कोळी आणि नणंद माधुरी दीपक कोळी या तिघींनी तिला शिवीगाळ, मारहाण करत मानसिक त्रास दिल्याचे समजते.

सततच्या छळामुळे विवाहितेने अखेर माहेरी शिरसोली येथे आश्रय घेत पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी पती, सासू आणि नणंद या तिघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चेतन पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम