शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला =अशोक जैन

बातमी शेअर करा...

शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाल्याचे वृत्त दुःखदायक आहे. जगातील सर्वात उंचीचा स्टॅचू ऑफ युनिटी हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य प्रकल्प मानला जातो. तसेच संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासह असंख्य कलाकृती त्यांनी निर्माण केल्या. जैन हिल्स येथील जगप्रसिद्ध गांधी तीर्थच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांचा पुतळा आणि इतर लहान पुतळेही त्यांनीच साकारलेले आहेत.  भारतीय कला, संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे म्हणता येईल. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 25 फेब्रुवारी 2020  ला भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचा ‘कांताई जैन साहित्य कला-जीवन गौरव’ हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता, याचा विशेष अभिमान आम्हाला आहे. त्यांनी साकारलेली शिल्प ही चिरकाल आठवणीत राहतील, हे नक्की.

असा शिल्पकार होणे नाही…

अशोक जैन

अध्यक्ष

जैन उद्योग समूह

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम