शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या शुक्रवारपासून मुलाखती -जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील

बातमी शेअर करा...

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या शुक्रवारपासून मुलाखती -जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील

पाचोरा प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील उमेदवार निश्चितीसाठी कंबर कसून कामाला लागले असून पाचोरा मतदार संघातील पाचोरा व भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असल्याने उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शिवसेने कडून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी जाहीर केला आहे.

आ.किशोर आप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांशी स्वतंत्ररीत्या संवाद साधणार आहेत.शुक्रवारी ता.७ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात पाचोरा शहरातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून शनिवारी ता.८ रोजी भडगाव नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती भडगाव येथील शिवसेना कार्यालयात सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहेत.
यावेळी इच्छुकांनी प्रभागाच्या परिपूर्ण माहितीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे आहे आवाहन शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम