
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे जळगावात भव्य जनआक्रोश मोर्चा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे जळगावात भव्य जनआक्रोश मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा डाव मांडून माजी कृषिमंत्र्यांचा निषेध
जळगाव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी ११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, शेतकऱ्यांचा बंद केलेला पिक विमा पुन्हा सुरू करावा यासह अनेक मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या. विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा डाव मांडला.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. यावेळी माजी खासदार उमेश पाटील, उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, जाहीर पठाण, भाऊसाहेब सोनवणे, गणेश गायकवाड, प्रमोद घुगे, निलेश ठाकरे, विजय बांदल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम