शिवसेना नेते संजय राऊत यांचा दोन दिवसीय जळगाव दौरा; आगामी स्थानिक निवडणुकीसाठी रणनिती आखणी

बातमी शेअर करा...

शिवसेना नेते संजय राऊत यांचा दोन दिवसीय जळगाव दौरा; आगामी स्थानिक निवडणुकीसाठी रणनिती आखणी

जळगाव l प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या रणनीतीचे धागेदोरे आखण्यास सुरुवात केली असून, या अनुषंगाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व उपनेते मनोज जामसुतकर आणि संपर्कप्रमुख संजय सावंत हे 30 व 31 मे रोजी दोन दिवसीय दौऱ्यावर जळगाव जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्ष संघटना, आगामी निवडणूक रणनिती आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यावर भर दिला जाणार आहे.

संजय राऊत यांचे 30 मे रोजी सायंकाळी 8 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होणार असून, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृह येथे जिल्हास्तरीय शिवसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका आणि प्रचाराचे धोरण यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीत संजय राऊत शिवसेना जिल्हा पदाधिकारी, महानगरप्रमुख, तालुका प्रमुख तसेच इतर प्रमुख कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तसेच पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी हा दौरा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

या दौऱ्याबाबतची अधिकृत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे आणि युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावा आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम