
शिवसेना भवनात युवासेना विभागीय सचिवांची बैठक; युवा संघटनात्मक कार्यावर चर्चा
शिवसेना भवनात युवासेना विभागीय सचिवांची बैठक; युवा संघटनात्मक कार्यावर चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : शनिवार, १७ मे २०२५ रोजी मुंबई येथील शिवसेना भवनात युवासेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील युवासेनेच्या विभागीय सचिवांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यभरातील युवासेनेच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्राचे युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, पश्चिम महाराष्ट्राचे अविनाश बलकवडे, मराठवाड्याचे विनायक चोथे व महेश खेडकर, ठाणे-पालघरचे अविनाश राऊत, धुळेचे युवासेना विस्तारक कुणाल कानकाटे, नाशिकचे जिल्हा समन्वयक सागर कोकणे, तसेच जळगाव लोकसभेचे कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रीतम शिंदे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध भागांतील युवासेनेच्या कार्यपद्धती, आगामी उपक्रम आणि युवा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. राज्यभरातील संघटन अधिक बळकट करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम