
शिवसेनेच्या कार्यकारिणी पुनर्रचनेची घोषणा
पाचोरा, भडगाव व चाळीसगाव शहर व ग्रामीण कार्यकारणीनवीन गठीत होणार
शिवसेनेच्या कार्यकारिणी पुनर्रचनेची घोषणा
पाचोरा, भडगाव व चाळीसगाव शहर व ग्रामीण कार्यकारणीनवीन गठीत होणार
जळगाव प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहरपाटील यांच्या आदेशानुसार पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तीनही तालुक्यांतील शिवसेना शहर व ग्रामीण कार्यकारणीचा कार्यकाळ 2022 ते 2025 संपत असल्याने पक्षाच्या ध्येयधोरणानुसार नवीन कार्यकारिणी गठित केली जाणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात मागील कार्यकारिणीचे योगदान अतुलनीय राहिले आहे. या योगदानाबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
नव्या कार्यकारिणीची घोषणा सन 2025 ते 2028 या कार्यकाळासाठी येत्या १५ दिवसांत करण्यात येईल. त्यामुळे पाचोरा, भडगाव व चाळीसगाव या तीनही तालुक्यांतील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम