
शिवाजीनगरात संगीतमय देवी भागवत कथेला प्रारंभ
शिवाजीनगरात संगीतमय देवी भागवत कथेला प्रारंभ
आज शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकेही रंगणार
प्रतिनिधी | जळगाव
श्री क्रीडा सामाजिक संस्था, श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे हळदी-कुंकूनिमित्त शिवाजीनगरात १२ फेब्रुवारीपासून संगीतमय देवी भागवत कथा होणार आहे. दरम्यान, १९ रोजी छत्रपती शिवजयंतीनिमित्त ग्रंथ मिरवणूक व श्री भागवत ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत कोल्हापूर पथकाकडून चित्तथरारक असे युध्दकलांचे सादरीकरण केले जाणार आहे.
कथावाचन पिंप्राळा येथील मनोज कुलकर्णी महाराज करतील. दुपारी १ वाजता कथेला सुरूवात होईल. विशेषतः रोज दुपारी १ आणि
सायंकाळी ५ वाजता विशेष मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आले. १३ फेब्रुवारीपासून रोज सजीव देखाव्यांचे सादरीकरण केले करण्यात आले. १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता काल्याचे किर्तन होवून दुपारी १२ वाजता मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, ग्रंथ मिरवणुकीत कोल्हापूरच्या शांतीदूत महिला आखाडाच्यावतीने शिवकालीन युद्धकलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातील. सप्ताहात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसंगानुरुप देखावे सादर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम