
शिवाजी महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिलाः – राधेश्याम चांडक
बुलडाणा अर्बन संस्थेच्या तिरुपती येथील भक्तनिवास मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसाद वाटप
शिवाजी महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिलाः – राधेश्याम चांडक
बुलडाणा अर्बन संस्थेच्या तिरुपती येथील भक्तनिवास मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसाद वाटप
बुलडाणा प्रतिनिधी
बुलडाणा अर्बन संस्थेच्या तिरुपती येथील भक्तनिवास मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने प्रसाद वाटप करण्यात आले.
हिंदवी संस्थापक स्वराज्याचे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आंध्रप्रदेशातील तिरुपती भक्त निवास येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी राधेश्याम चांडक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत.छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्म तेज दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला समतेचा संदेश दिला. १८ पगड जातींना एकत्रित करुन ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केले पाहिजे हे शिवरायांनी शिकवले. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी शिकवले असे मोलाचे मार्गदर्शन राधेश्याम चांडक होते.या प्रसंगी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, सी.ए. सचिन वैद्य, अनंत देशपांडे तसेच शाखा व्यवस्थापक, इतर कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित. होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम