शिष्यवृत्ती परीक्षेत चंपाबाई कळंत्री विद्यालयाचा उज्वल यशोशृंगार

बातमी शेअर करा...

शिष्यवृत्ती परीक्षेत चंपाबाई कळंत्री विद्यालयाचा उज्वल यशोशृंगार
पाचवी-आठवीचे आठ विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्तेत चमकले

चाळीसगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. इयत्ता पाचवीतील पाच व आठवीतील तीन अशा एकूण आठ विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि तालुका गुणवत्तायादीत आपले स्थान मिळवले.

या परीक्षेत इयत्ता पाचवीतील वेदिका नितीन निकम हिने २४८ गुण, काव्या उज्वल पाटील हिने २४४ गुण, अंशुमन अंगद ढाकणे याने २१८ गुण, काव्य मनोज कोतवाल हिने २१० गुण आणि यशश्री अमोल खेडकर हिने १८४ गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर आठवीतील अनिश्वर प्रशांत शेलार याने २२० गुण, यश शालिक पगार याने २०४ गुण आणि मृणाल वीरेंद्र पवार हिने १९८ गुण मिळवले.

या यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन मा. नारायणभाऊ अग्रवाल, व्हाईस चेअरमन श्री. योगेशभाऊ अग्रवाल, अध्यक्ष श्री. आर. सी. पाटील सर, उपाध्यक्ष श्री. मिलिंद दादा देशमुख, सचिव डॉ. विनोदजी कोतकर, शाळेचे चेअरमन श्री. भोजराजजी पुंशी, सहसचिव प्रा. डॉ. मिलिंद बिल्दीकर सर यांच्यासह शाळा समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि अभ्यासासाठी सहकार्य करणाऱ्या पालकांचे देखील या यशामध्ये मोठे योगदान असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम