
शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिवस साजरा
शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिवस साजरा
शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी
देशाचे ११ वे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासनाने वाचन प्रेरणा दिवस साजरी करण्याचे जाहीर केले असल्याने त्या अनुषंगाने शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालया तर्फे दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता गुरुकुल विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे माजी सचिव सतीश काशीद होते तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालिका उज्वला काशीद, सहकार महर्षी उत्तमराव थोरात , पारस पतसंस्थेचे संचालक प्रकाश झंवर सामाजिक कार्यकर्ते वामन फासे , सेवानिवृत्त पोस्टमास्टर अशोक भारुडे , सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनार , डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय सुर्वे, गुरुकुल विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी प्राचार्य डॉ. भक्ती कुलकर्णी , मौलाना आझाद पतसंस्था चेअरमन इमाम शेठ, वाचनालयाचे अध्यक्ष अतुल जहागीरदार , वाचनालयाचे सचिव रवींद्र सूर्यवंशी, ,संचालक वीरेंद्र पाटील, धीरज जैन, श्रीकांत काबरा, संजय कावडीया जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय बारी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शरीफ सर आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, माता सरस्वती, भारत माझा , डॉ. ए.पी.जे कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले व दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष अतुल जागीरदार यांनी केले
तर प्रमुख वक्ते सहकार महर्षी उत्तमराव थोरात यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र आपल्या मनोगत आतून व्यक्त केले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश काशीद यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका अर्चना थोरात यांनी केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम