
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून महिलेला ९ लाखात गंडवले
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून महिलेला ९ लाखात गंडवले
जळगाव : शेअर मार्केटमध्ये नफा झाल्याचे भासवून
नंतर अधिकची गुंतवणूक करण्यास सांगत स्मिता अतुल महाजन (४३, रा. चहार्डी, ता. चोपडा) या महिलेची आठ लाख ९३ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील स्मिता महाजन यांच्याशी मोहीत शर्मा, आशिष भारद्वाज नामक व्यक्तींनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला नफा झाल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला व अधिकची गुंतवणूक करण्यात सांगितले. त्यानुसार सदर महिलेकडून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी रक्कम स्वीकारली. या प्रकरणी स्मिता महाजन यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम