
शेगांवात ‘रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा बालाजी मंदिर येथे सत्कार..
सत्कार सोहळ्यामध्ये एकूण १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शेगांवात ‘रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप’ द्वारा गुणवंत विद्यार्थ्यानचा बालाजी मंदिर येथे सत्कार
सत्कार सोहळ्यामध्ये एकूण १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शेगाव /प्रतिनिधी
शेगांव, ता. ०२ मार्च २०२५ शेगांव येथील सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे व आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवक म्हणून अहोरात्र काम करणारे व्यक्तिमत्त्व आशिषभाऊ सावळे यांनी 8 फेब्रुवारी २०२५ ला भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. सदर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा भव्य स्वरूपाचा सत्कार सोहळा प्रथमच शहरात पार पडला.
शेगांव शहराचे ठाणेदार मा. नितिन पाटील साहेब म्हणाले, ‘‘गुणगौरव समारंभ हा विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि बळ देत असतो. त्यामुळे रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप जे उपक्रम शहरात राबवत आहे जे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारून स्वत:ला घडवावे आणि देश विकासात योगदान द्यावे.’’
शहराचे माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल म्हणाले, रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापकअध्यक्ष आशिष सावळे हे नेहमी अशा उपक्रमात अग्रेसर आहेत परंतु यावळेस विद्यार्थ्यांना महाराजांचा पराक्रम,शौर्य,वीरता समजण्याचा जी स्पर्धा आयोजित केली ती खरंच अभिमानास्पद आहे. ‘‘ अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्य राखणे महत्वाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहून वाचन, मनन करून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करावा आणि जीवनात पुढे जावे.’
या सत्कार सोहळ्यामध्ये एकूण १००० हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शरदसेठ अग्रवाल (माजी नगराध्यक्ष) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. नितिन पाटील साहेब (ठाणेदार शेगांव शहर) गजनानभाऊ जवंजाळ (माजी नगरसेवक) राजेश अग्रवाल (जिल्हा ) पवनजी शर्मा महाराज (माजी नगरसेवक) विजय यादव (माजी नगरसेवक) नागेशबाप्पू देशमुख (युवा उद्योजक), प्रविण मोरखडे (सामाजिक कार्यकर्ते) ॲड. प्रथमेश माने साहेब, विजय लांजुळकर (युवा उद्योजक) अमोल चव्हाण (युवा उद्योजक) आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक मा. शंकर कराळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफ एम काशेलानी शाळेचे सहसंचालक शुभम देशमुख सर यांनी केले. रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आशिषभाऊ सावळे यांनी आभार मानले.
सदर स्पर्धेत विशेष सहकार्य म्हणून राष्ट्रमाता इंदिरा गांधी न.प. शाळेचे क्रीडा शिक्षक मा. कोल्हे सर व एफ एम काशेलानी शाळेचे क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर, शंकर बुरूंगे सर, अजय काटोले सर, लतिश थानवी सर, अहमद खान सर,उपस्थिती होते व निखिल तायडे, विजय झापर्डे, मंगेश पाटील, धनंजय फरताडे, अभय हिंगणे, अभय हांडे, कुशाल सारवान, मंगेश तायडे, आकाश वारके, अक्षय जढाल, अभिषेक कानोजे, अभि पाल्हाडे, संदेश गवई यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम