शेगाव तालुक्यातील सर्व गावात वारी चे पाणी द्या – कैलास फाटे

शेगाव तालुक्यातील केस गळती सोबतच दुसऱ्या आजाराची भीती

बातमी शेअर करा...
शेगाव तालुक्यातील सर्व गावात वारी चे पाणी द्या – कैलास फाटे
शेगाव तालुक्यातील केस गळती सोबतच दुसऱ्या आजाराची भीती
शेगाव /प्रतीनीधी 
शेगाव तालुक्यात केस गळती आजाराने थैमान घातले आहे. सुरवातीला फंगल इन्फेक्शन चा दावा केला गेला परंतू काही नमुने तपासणीअंती हा दावा खोटा ठरला असून  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR चे अधिकाऱ्यांनी असला प्रकार अख्या जगात कुठेही आढळला नसल्याचे सांगितले आहे. पाण्याचे TDS 110 हवे असतांना ते तब्बल 2100 च्या वर असल्याचे पाण्याची चाचणी करतांना आढळले आहे.
2100 TDS चे पाणी बाह्य शरीराला घातक असल्याचे दिसून येत आहे त्याच प्रमाणे ते आंतर शरीराला सुध्दा महाघातक ठरू शकते.
संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यामुळे किडनी आजाराचे थैमान माजले असतांना सदर गावांमध्ये वारी धरणाचे पिण्यायोग्य पाणी पुरविण्यात आले.
तेंव्हा पासून त्या भागात राहणाऱ्या रहिवास्यांचा किडनी आजारापासून सुटका झाल्याचे दिसून येत आहे, त्याचप्रमाणे शेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये वारी धरणाचे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करा जेणेकरून नवीन रोगाला शेगाव तालुका वासीयांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. ही जवाबदारी जिल्हाधिकारी म्हणून आपली आहे.
असे पत्र जिल्हाधिकारी यांना सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संस्थापक कैलास फाटे यांनी दिले असून शासनाकडे सुध्दा सदर मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम