शेगावात श्रीचा प्रगटदीन उत्सव साजरा…लाखो भाविकांनी घेतले श्रीचे दर्शन

गण गण गात बोते च्या गजरात भक्त श्रीच्या चरणी नतमस्तक...

बातमी शेअर करा...

शेगावात श्रीचा प्रगटदीन उत्सव साजरा…लोखो भाविकांनी घेतले श्रीचे दर्शन

गण गण गात बोते च्या गजरात भक्त श्रीच्या चरणी नतमस्तक…

शेगाव प्रतिनिधी

जय गजानन श्री गजानन…गण गण गणात बोते च्या गजरात भाविक श्रीच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो भाविकांनी घेतले दर्शन श्रींचा 147 वा प्रकटदिन उत्सव 13/02/2025 ते 20/02/2025 या कालावधीत धार्मिक परंपरेनुसार पार पडला. रोज सकाळी 6.00 ते 6.45 पर्यंत काकडा, 7.15 ते 9.15 पर्यंत गाथा भजन, 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5.30 ते 6 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 श्रीहरी कीर्तन होणार आहे. सप्ताहात श्री ह.भ.प.अनंतबुवा कानवडे, कळमुला, श्री.ह.भ.प. वासुदेवबुवा कोळंबीकर, नायगाव बा., श्री.ह.भ.प. प्रशांत बुवा टाकोटे, सिरसोली, श्री.ह.भ.प. अनंत बुवा बिडवे, बार्शी, श्री.ह.भ.प. राम बुवा डोंगरे, जतनांदूर, श्री.ह.भ.प. मयूरबुवा बोडखे, श्री.क्षेत्र देहू, श्री.ह.भ.प. श्रीहरीबुवा वैष्णव, जालना, श्री ह.भ.प. श्री रामबुवा ठाकूर, लातूर व इतर कीर्तनकारांची कीर्तने संपन्न झाली.

श्री महारूद्र स्वाहाकार यागास माघ वद्य १ ला प्रारंभ होवून माघ वद्य ७ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच ‘श्रींच्या प्रागट्टया’ निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला.

यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवांत श्रींचे सेवेत १००१ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १०९ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्ती करीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली.

तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन २,३०,००० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, अशारितीने श्री कृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे. असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम