शेगाव येथे मोफत डोळ्याच्या शिबिरात 20 रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन

गरजू रुग्णांसाठी सामाजिक उपक्रमाचा स्तुत्य उपक्रम

बातमी शेअर करा...

शेगाव येथे मोफत डोळ्याच्या शिबिरात 20 रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन

गरजू रुग्णांसाठी सामाजिक उपक्रमाचा स्तुत्य उपक्रम

शेगाव /प्रतीनीधी

शेगाव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे गरजू रुग्णांसाठी मोफत डोळ्याच्या तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत 20 गरजू रुग्णांचे डोळ्याचे मोफत ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. हा सामाजिक उपक्रम सईबाई उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे राबवण्यात आला.

या शिबिरात सर्व रुग्णांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये डोळ्यांचे संपूर्ण परीक्षण, त्यामधील समस्या ओळखणे आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 20 रुग्णांची डोळ्याची ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडली.
याशिवाय, उर्वरित रुग्णांची आठवड्या मध्ये दोन दिवस कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना त्यांच्या डोळ्याच्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण मोफत उपचार देण्यात आले शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन सामाजिक कार्यात योगदान दिले. उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये राजूभाऊ मिरगे (उपजिल्हाप्रमुख)रामाभाऊ थारकर (तालुकाप्रमुख)
संतोष भाऊ लिप्ते (शहर प्रमुख)पवन भाऊ बरिंगे (सरपंच, किसान सेना उपजिल्हाप्रमुख)मोहन लाजुडकर (उप तालुकाप्रमुख)गोपाल भाऊ बोरसे (विभाग प्रमुख)
डॉ. अतुल पाटील, डॉ. नाफडे, डॉ. रवी शिंदे बुलढाणा यांचा समावेश होता. या मान्यवरांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद

मोफत ऑपरेशननंतर अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले. “माझे अनेक महिने डोळ्यांचे त्रास होत होते, पण पैशाअभावी उपचार घेता आले नाहीत. या शिबिरामुळे मला मोफत उपचार मिळाले आणि आता मला स्पष्ट दिसू लागले आहे,” असे एका रुग्णाने सांगितले.
या उपक्रमामुळे अनेकांना नव्याने जग पाहण्याची संधी मिळाली आहे. भविष्यातही अशीच मोफत आरोग्य शिबिरे घेण्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे घेणे गरजेचे आहे. भविष्यातही आम्ही अशाच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊ,असे राजूभाऊ मिरगे यांनी सांगितले.

रुग्णांसाठी महत्त्वाची सूचना

“ज्या रुग्णांची तपासणी झाली असून, ज्यांना ऑपरेशनसाठी तारीख देण्यात आली आहे, त्यांचे ऑपरेशन लवकरच करण्यात येईल. तसेच, जे नागरिक या शिबिरात उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी नव्याने शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.शेगाव तालुक्यातील नागरिकांनी आरोग्यविषयक कोणत्याही समस्येसाठी आमच्याशी संपर्क साधावा. गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”संपर्क:
रामाभाऊ थारकर – 99 22 47 43 86 शिवसेना शेगाव तालुका प्रमुख

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम