शेतकरी जन आक्रोश मोर्चात चिथावणीखोर भाषणे केल्याबद्दल 13 जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

शेतकरी जन आक्रोश मोर्चात चिथावणीखोर भाषणे केल्याबद्दल 13 जणांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी | जळगाव ;शेतकरी जनआक्रोश मोर्चादरम्यान चिथावणीखोर भाषणे करून आंदोलकांना भडकावणे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात घुसखोरी करून पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तब्बल १० कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील सभेत उन्मेष पाटील यांनी आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्ये केली, असा आरोप आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावूनही आंदोलकांनी जबरदस्तीने कार्यालयात घुसखोरी केली. या धक्काबुक्कीत पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अॅड. जमील देशपांडे, गुलाबराव वाघ, शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, संग्रामसिंग सूर्यवंशी, प्रमोद पाटील, बाळासाहेब पवार, विजय राठोड, कुलभूषण पाटील, संदीप पाटील आणि सुनील देवरे या जणांचा समावेश आहे.

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नाईक भरत चव्हाण यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम