शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा

जळगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज दि.१७बुधवार रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा माजी आ.बच्चू कडू, माजी खा.उन्मेश पाटील उबाठा गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव जिल्हाभरातून सहभागी झाले होते.

आज दुपारी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला . कापसाला हमी भाव, पीक विमा, केळीला बोर्डावरील भाव तसेच पीक विमा, शेतकऱ्याला कर्जमुक्ती, सोयाबीन, ज्वारी यांना हमीभाव देण्यात यावा,आदी प्रमुख मागण्यांसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चामध्ये शेतकरी संघटनांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या केळी, कापसाला हभी भाव आणि पीक विम्याची रक्कम, दूध उत्पादकांना अनुदान, सोयाबीन, ज्वारीला भाव तसेच कर्जमाफी या मागण्यांचाही समावेश होता.

शिवसेनेचे गुलाबराव वाघ, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील काँग्रेसचे शामकांत तायडे, मनसेचे जमील देशपांडे, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, सुनील देवरे, छावाचे भीमराव मराठे, कुलभूषण पाटील, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, नीलेश चौधरी, संग्राम पाटील, भाऊसाहेब सोनवणे, राजु नवाल यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम