
शेतकऱ्यांना ई -केवायसी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शेतकऱ्यांना ई -केवायसी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून, अनुदान प्राप्त झाले असून तालुकास्तरावरुन या अनुदान वाटपाबाबतचे काम सुरु आहे.
शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी पोर्टल ५ नोव्हेंबर २०२५ पासुन सुरु झाले असून ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन
करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम