लहान व मध्यम शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज देण्यात यावी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची राज्य शासनास मागणी

"मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना" पासूनशेतकरी  वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील 

बातमी शेअर करा...

लहान व मध्यम शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज देण्यात यावी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची राज्य शासनास मागणी

“मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना” पासूनशेतकरी  वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील 

जळगांव l प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना महायुती सरकार बिल माफ करणार असल्याबाबत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती, तरी 10 ते 15 एचपी पर्यंत मोटर्स असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज देण्यात यावी अशी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात

महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशन मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकार ने शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना” आणली होती, सदर योजनेत 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली,

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन असे कळविले आहे की, जळगांव जिल्ह्यात केळी पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून, अनेक भागातील पाणी पातळी ही 200 फुटापर्यंत असल्याने शेतकऱ्यांना 10 ते 15 एचपी मोटर्सची आवश्यकता असते,

त्यामुळे सदर अल्प भूधारक शेतकरी आपल्या “मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना” पासून वंचित राहणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष बघण्यास मिळत आहे. तरी “मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना” अंतर्गत 10 ते 15 एचपी पर्यंत मोटर्स असणाऱ्या लहान व मध्यम शेतकऱ्यांना सुद्धा मोफत वीज देणे बाबत राज्य शासनास विनंती केली असता.

सदर बाबीवर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झालेली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार असल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना आश्वासन दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम