शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा वापर करावा – कृषीभूषण विश्वासराव पाटील

नांद्रा येथे नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण

बातमी शेअर करा...

शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा वापर करावा – कृषीभूषण विश्वासराव पाटील

नांद्रा येथे नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण

जामनेर I प्रतिनिधी

कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2024 – 25 अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण शिबिर नांद्रा प्र. लो. येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माती पूजन तसेच जिजाऊ मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष, महिला शेतकरी गट या होत्या. प्रमुख मार्गदर्शक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्री. विश्वासराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कृषि अधिकारी एस. ओ. अहिरे बी.के. चिमकर , नकुले, राहुल निकम उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना, प्रमुख मार्गदर्शन व कृषीविषयक योजनांची माहीती कृषि अधिकारी श्री. अहिरे यांनी केली.

कृषीभूषण विश्वासराव पाटील यांनी उपस्थित शेतकरी प्रशिक्षणार्थींना जमिनीला श्रीमंत करा, तुम्ही श्रीमंत व्हाल. तसेच नैसर्गिक शेतीच्या मूलभूत बाबी समजून घेतल्या पाहिजे. बहुपीक पद्धतीचा वापर करावा. पिकाची फेरपालट जमिनीचा आत्मा आहे तसेच जीवांनी जीवांसाठी केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती. अशी सविस्तर नैसर्गिक शेतीबाबत माहिती सांगितली तसेच स्वानुभव कथन करीत कुणब्याची छडी ही कविता उपस्थितांसमोर सादर केली.
डॉ.संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, नाचणखेडा यांनी पशुपालनातून शाश्वत उत्पन्न व आधुनिक पशुपालन कसे करावे. मुक्त गोठा मुक्त संचार गोठा बाबत सविस्तर माहिती सांगितली. श्री. नकुले यांनी कार्यक्रमाचे विवेचनात्मक विश्लेषण केले.

राहुल निकम यांनी कृषि विषयक योजनांची माहीती दिली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम