
शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन;इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन;इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव, राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकमित आणि आधुनिक तत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात कृषि मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषिमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युरोप, इस्त्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरीया देशांची निवड करण्यात आली आहे.
याकरिता शेतकरी हा स्वतःच्या नावावर शेती असलेला, नियमित शेती करणारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असलेला असावा. वय २५ ते ६० वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी आणि शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली असावी.शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे व वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शासकीय/निमशासकीय/खाजगी नोकरी करत असलेले अर्जदार पात्र ठरणार नाहीत.तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इऩसावा. शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून विदेश दौरा केलेला नसावा. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लक्ष रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. त्यात एक महिला शेतकरी, एक केंद्र/ राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी व पीक स्पर्धा विजेता शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
तरी योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना लाभ घेणेकरिता दिनांक 29 जूलै पर्यंत नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी / उपविभागीय कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम