शेतातील विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गिरडगावमध्ये हळहळ

बातमी शेअर करा...

शेतातील विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गिरडगावमध्ये हळहळ

यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात सोमवारी (२६ मे) शेतातील विहिरीजवळ काम करत असताना तोल जाऊन पडल्याने शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिलीप उत्तम पाटील (वय ५२, रा. गिरडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दिलीप पाटील हे आपल्या कुटुंबियांसह गिरडगाव येथे वास्तव्यास होते. सोमवारी दुपारी ते शेतातील विहिरीजवळ काही काम करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दिन शेख करीत आहेत. दरम्यान, या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गिरडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम