शेतात शेळ्या चारण्यावरून वाद, वृद्धाला मारहाण

बातमी शेअर करा...

शेतात शेळ्या चारण्यावरून वाद, वृद्धाला मारहाण
​जळगाव: शेतात शेळ्या चरण्यासाठी घालण्यावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एका ७४ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव तालुक्यातील कंडारी येथे घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​कंडारी येथील रहिवासी लक्ष्मण परदेशी (वय ७४) यांच्या शेतात ७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन व्यक्ती शेळ्या चारत होत्या. परदेशी यांनी त्यांना हटकले असता, याचा राग मनात धरून त्या तिघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
​यानंतर लक्ष्मण परदेशी समजूत घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता, तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या डोक्यात दगडी वराटा घालून गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मण रामदास परदेशी, बादल लक्ष्मण परदेशी आणि आकाश लक्ष्मण परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तायडे पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम