शेतात ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

शेतात ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : भडगाव तालुक्यातील लोण गावातील सुनील भारत पवार (वय ३०) या तरुणाने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील जवखेडे बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पवार हे दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी शेतात गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, शेतामध्ये झाडाला बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले.

तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद एरंडोल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे लोण व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम