
शेतीचे रस्ता गाव तिथे समृद्धी : मौजे बोरखेडा येथील शिव रस्ता मोकळा होणार
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचा सहभाग
शेतीचे रस्ता गाव तिथे समृद्धी : मौजे बोरखेडा येथील शिव रस्ता मोकळा होणार
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचा सहभाग
धरणगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळीच्या वतीने आज धरणगाव तालुका येथील मौजे बोरखेडा येथील शिव रस्ता मोकळा करणे कामी आज 28 रोजी झुरखेडा मंडळ अधिकारी महाजन भूमी अभिलेखचे विभागाचे अधिकारी तसेच तलाठी सोनवणे आप्पा व लोकनियुक्त सरपंच विजय पाटील तसेच शेतकरी गजानन पाटील, रतिलाल पाटील, प्रेमदास पाटील, गजानन पाटील, नारायण पाटील, विठ्ठल पाटील, डी. पी पाटील, रवींद्र पाटील, तसेच वंजारी गावचे शेतकरी समाधान पाटील रतन महाजन भिका पाटील शेतकरी उपस्थित होते.
तसेच धरणगाव तालुका शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे सदस्य प्रेमराज पाटील यांच्या उपस्थितीत आज सदरील शिवरस्त्याची पाहणी करून लवकरच हा शेतकऱ्यांचा समृद्धीचा महामार्ग खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लवकरचआश्वस्त केले.
सदरील प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे मांडून लवकरच तारीख देऊन हा रस्ता शेतकऱ्यांसाठी मोकळा करण्यात येईल सर्व शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत आपल्या भावना प्रकट केल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम