शेतीचे रस्ते मोकळे, समृद्धीकडे वाटचाल!”

बोरखेडा-चिंचपुरा येथे शिवरस्ता मोकळा करण्यास गती

बातमी शेअर करा...

शेतीचे रस्ते मोकळे, समृद्धीकडे वाटचाल!”

बोरखेडा-चिंचपुरा येथे शिवरस्ता मोकळा करण्यास गती

अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

धरणगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने धरणगाव तालुक्यातील मौजे बोरखेडा-चिंचपुरा येथील शिवरस्ता मोकळा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.

दिनांक 07 मार्च 2025 रोजी, झुरखेडा मंडळ अधिकारी श्री. महाजन, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी श्री. अमोल पाटील, तसेच तलाठी सोनवणे आप्पा आणि मुसळी तलाठी मॅडम यांनी या शिवरस्त्याची पाहणी केली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

या वेळी लोकनियुक्त सरपंच विजय पाटील आणि शेतकरी प्रतिनिधी विलास चौधरी, सुनील चौधरी, अनिल पाटील, मधुकर पाटील, डॉ. सुनील पाटील, गौरव पाटील, दिलीप पाटील, सुनील सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते.

शिवरस्ता चळवळीचे सक्रिय सदस्य प्रेमराज पाटील यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या अडथळ्यांची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरच रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले.

तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर होणार

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा प्रस्ताव लवकरच तहसीलदारांकडे सादर केला जाईल आणि ठराविक तारखेला हा रस्ता शेतकऱ्यांसाठी मोकळा करण्यात येईल.

या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीसाठी पोहोच सुविधा सुलभ होणार आहे.

शेतकऱ्यांचे समाधान आणि आभार

या सकारात्मक निर्णयाबद्दल सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या भावना प्रकट केल्या.

रस्ता मोकळा – शेतीला गती!”

शेतीला आधुनिक व समृद्ध बनवण्याच्या दिशेने हा रस्ता शेतकऱ्यांसाठी ‘समृद्धीचा महामार्ग’ ठरणार आहे!

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम