
“शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी”
बोरखेडा-चिंचपुरा येथे शिव रस्ता मोकळा
धरणगाव प्रतिनिधी
शिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या नेतृत्वाखाली धरणगाव तालुक्यातील बोरखेडा-चिंचपुरा शिवारातील शिव रस्ता मोकळा करण्यात आला. २२ मार्च २०२५ रोजी हा उपक्रम मा. उपविभागीय अधिकारी (एरंडोल) आणि मा. तहसीलदार (धरणगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शिव रस्ता मुक्ती अभियानासाठी शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्य प्रणेते शरदराव पवळे आणि राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुका शेतकरी चळवळीचे सक्रिय सदस्य श्री. प्रेमराज पाटील यांसह अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.
यावेळीकांतीलाल पाटील, विलास चौधरी, दिलीप पाटील, सुनील सूर्यवंशी, गौरव पाटील, मधुकर पाटील, अनिल भगवान पाटील तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
या महत्वपूर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी ये-जा करणे सोपे होणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडणार आहे. “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” या ध्येयाने प्रेरित होऊन पुढेही अशी चळवळ वेगाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम