
शेत रस्त्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात मारला दगड
शेत रस्त्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात मारला दगड
अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील कळमसरे येथे शेत रस्त्यावरून उद्भवलेल्या किरकोळ वादाने उग्र रूप धारण करत एका महिलेच्या डोक्याला दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमसरे येथील शीतल प्रदीप महाजन (३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सासू आणि जेठाणीसह पेरणीसाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा रस्त्यात पसरलेले काटे त्या उचलत असताना, शेजारील शेतमालक तुळशीराम त्र्यंबक महाजन व त्यांची पत्नी सरलाबाई तुळशीराम महाजन तेथे आले.
काटे का उचलता तसेच “इकडून ट्रॅक्टर जाऊ देणार नाही” म्हणत दोघांनी शीतल महाजन यांच्याशी शिवीगाळ केली. शीतल यांनी विरोध केल्यावर तुळशीराम यांनी अचानक दगड उचलून त्यांच्या कपाळावर जोरदार मार केला. या हल्ल्यात त्यांचे डोके फोडले गेले. याचदरम्यान आरोपी दाम्पत्याने “येथेच गाडून टाकू” अशी धमकीदेखील दिली. या गंभीर प्रकारावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास स.फौ. संजय पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम