
शेळगाव बॅरेजमुळे यंदा चोपडा तालुक्यातील १७ गावांना जलसंजीवनी
प्रकल्पातून पहिल्यांदा सुटणार आवर्तन आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
शेळगाव बॅरेजमुळे यंदा चोपडा तालुक्यातील १७ गावांना जलसंजीवनी
प्रकल्पातून पहिल्यांदा सुटणार आवर्तन आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश
चोपडा प्रतिनिधी
शेळगाव बॅरेज प्रकल्पातून पहिल्यांदा आवर्तन सुटणार असून याचा फायदा जिल्ह्यातील चार तालुक्यांना होणार असून चोपडा तालुक्यातील पुनगाव , मितावली , पिंप्री ,वडगाव , वटार , सुटकार , खेडी ,भोकरी , कोळंबा , सनफुले , कठोरा , कुरवेल निमगव्हाण , तावसे , खाचणे या गावांना फायदा होणार आहे.
चोपडा तालुका कार्यसम्राट प्रा. आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नातून पाणीटंचाई निवाराणार्थ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली
जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच त्यातून आवर्तन सोडले जाणार आहे तरी यात चोपडा तालुक्यातील १७ गावांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी मोठा दिलासा मिळणार आहे शेळगाव बॅरेज प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयामुळे परिसरातील १७ गावांना भर उन्हाळ्यात सलग दोन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे .
त्यातून गावकऱ्यांना पाणी टंचाई संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे तसेच शेतकरी बांधवांना शेतामधील विहीरी व बोअरवेल च्या पाणी पातळीत वाढ होणार आहे त्यातून शेतकरी बांधवांना ही मोठा फायदा होणार आहे .
प्रशासनाने यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब , जलसंपदा विभागाची प्रभारी कार्यकारी अभियंता कामेश पाटील हे नियोजन करीत असून सध्या तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाई होत असल्याकारणाने प्रशासनाला त्वरित पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
खालील गावांना याचा फायदा होणार
पुनगाव , मितावली , पिंप्री ,वडगाव , वटार , सुटकार , खेडी , भोकरी , कोळंबा , सनफुले , कठोरा , कुरवेल निमगव्हाण , तावसे , खाचणे या गावांच्या समावेश आहे.
तसेच या बैठकीत आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी गुळ मध्यम प्रकल्पाचे पाणी डावा व उजवा कालव्याद्वारे सोडण्यात यावे अशी सुचना दिली यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी यांनी लवकरच गुळ मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येईल असे सांगितले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम