शेळीला वाचवताना खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू 

बातमी शेअर करा...

शेळीला वाचवताना खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू 

यावल तालुक्यातील घटना

यावल (प्रतिनिधी) :
कोरपावली गावातील अवघ्या १८ वर्षीय तरुणाचा सांडपाण्याच्या खड्ड्यात गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. एक शेळी सांडपाण्याच्या खड्ड्यात पडल्याने ती वाचविण्याच्या प्रयत्नात हा तरुणही खड्ड्यात उतरला. मात्र चिखलात रुतून त्याचा श्वास गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे असून तो मेंढ्या-शेळ्या चारून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील होता.

घटनेचा थरकाप उडवणारा तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश महाजन हा आपल्या मेंढ्या-शेळ्या चारून संध्याकाळी गावाकडे परतत असताना, गावाबाहेरील सांडपाण्याच्या खड्ड्यात एक शेळी चुकून पडली. जयेशने तिला वाचवण्यासाठी स्वतःही त्या खड्ड्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिखल खोल व सरकणारा असल्याने त्याचा तोल गेला आणि तो त्यात खोलवर रुतत गेला. श्वास कोंडल्यामुळे काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांची धावपळ व असफल प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जयेशला मोठ्या प्रयत्नांनंतर चिखलातून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृ उभा सभापती राकेश हेगडे, सरपंच विलास अडकमोल, उमेश जावळे व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयेशला मृत घोषित केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम