
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता एम.एस.डब्ल्यु. (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता एम.एस.डब्ल्यु. (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा
जळगाव (११) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता एम.एस.डब्ल्यु. (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व समाजकार्य महाविद्यालये, विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील समाजकार्य विभाग आणि कबचौउमवि. संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार साठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दि. १२ जुलै, २०२५ रोजी दुपारी १२.०० ते ०.१.०० वा या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी समाजिकशास्त्रे प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, धुळे जिल्हया करीता विद्यावर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे व नंदुरबार जिल्हया करीता जी.टी.पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार या परीक्षा केंद्रांवर सामाईक प्रवेश परीक्षा होणार आहे. तरी संबंधीत विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे प्रा. किशोर एफ. पवार, कार्याध्यक्ष, एम.एस.डब्यु. (प्रथम वर्ष) ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती यांनी कळविलेले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम