श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), येथे पालक सभा

बातमी शेअर करा...

श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), येथे पालक सभा

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), चोपडा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

सर्व विभाग प्रमुखांनी शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त व वर्तन, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, इंडस्ट्रियल व्हिजिट व गेस्ट लेक्चर, कौशल्य विकास, पालकांचा सहभाग तसेच भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले.या पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती, अंतर्गत परीक्षांतील गुण आणि शिस्तीबाबत पालकांना अवगत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला मोबाईलचा वापर व त्याचे दुष्परिणाम यावर विशेष भाष्य केले. मोबाईलचा योग्य शैक्षणिक उपयोग झाला पाहिजे, मनोरंजनाच्या आहारी जाऊन शिक्षणात अडथळा येता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, पालकांनी घरी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवून त्यांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच प्राचार्यांनी पालक-शिक्षक-विद्यार्थी या त्रिसूत्रीतील संवाद अधिक मजबूत झाल्यासच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लागेल असे सांगितले. पालक प्रतिनिधी श्री. मिलिंद सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ,

इंद्रजीत गोकुळ पाटील, कुलदीपसिंग भरतसिंग पाटील,महेंद्र सोनार व तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पालकांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली आणि शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सर्वांनी नमूद केले.पालक सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम