श्रीलंकेकडून ८ भारतीय मच्छीमारांना अटक
आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप
कोलंबो I वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीचे उल्लंघन केल्याच्या आरोपान्वे श्रीलंकेने रविवारी भारताच्या ८ मच्छीमारांना अटक केली आहे. या कारवाईत मच्छीमारांच्या दोन नौका जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती लंकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लंकेच्या नौदलाने मन्नार लगतच्या समुद्री हद्दीत विशेष अभियान राबवले. या दरम्यान भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. भारतीय मच्छीमारांच्या २ नौका इरानतिवू बेटावर आणल्या असून, कायदेशीर कारवाईसाठी मच्छीमारांना किलिनोच्चीच्या सहायक मत्स्य संचालनालयाकडे सुपूर्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या १२ दिवसांत श्रीलंकेने भारताच्या १८ मच्छीमारांना अटक केली असून, त्यांच्याकडील ३ नौका जप्त केल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम